गृहअर्थशास्त्र विभागा द्वारे प्रदर्शन व बिक्री चे आयोजन 18/02/2025

गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित स्थानिक एस. एस.गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथील गृहअर्थशास्त्र विभाग आणि उद्योजकता कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्मॉल स्केल स्टार्ट अप इनोव्हेशन प्रोजेक्ट या विषयावर प्रदर्शनी व विक्री आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थिनींमध्ये उद्योजकता कौशल्ये विकसित करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि शिक्षण घेत असताना त्यांना कमावण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
गृहअर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जी. ए. भालेराव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध कौशल्ये, संसाधने, हंगाम आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कमी खर्चात उत्तम रोजगार कसा सुरू करता येईल यावर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून विविध साहित्य तयार करून त्यांना उद्योजकतेशी संबंधित नवीन कौशल्ये शिकवण्यात आली. या सोबतच तयार साहित्याचे पॅकिंग, लेबलिंग, किंमत निर्धारण मार्केटिंग याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले साहित्य प्रदर्शनात ठेवण्यात आले असून प्रदर्शनी चे उदघाटन महाविद्यालया च्या प्रभारी प्राचार्या डॉ. जैन, श्री.नरेश वाडके जज गोंदिया ,श्री. संजय मारवाडे, श्री. प्रभाकर प्लांदूरकर (सायबर क्राईम ब्रांच ),आडवोकेट शबाना अन्सारी ह्यांच्या द्वारे केले गेले. संपूर्ण प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. जी. ए. भालेराव, डॉ.माधुरी खोब्रागडे, प्रा. दीप्ती ब्राह्मणकर, प्रा. रश्मी रणदिवे, व सर्व विद्यार्थिनींनी च्या सहकार्य ने केले गेले.