एस. एस. गर्ल्स महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे उद्घाटन 04/09/24

स्थानिक गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित एस. एस. गर्ल्स कॉलेज मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे उत्साहाने उद्घाटन करण्यात आले. त्या निमित्ताने स्थानिक केटीएस सामान्य रुग्णालयाच्या सौजण्याने महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले . शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अर्चना जैन , गृह विज्ञान शाखा प्रमुख डॉक्टर निता खांडेकर, डॉ. कांचन भोयर (PT) , भाविका बघेले ( Eye donation conseler), निधी मिश्रा (स्टाफ नर्स) व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्या डॉ. अर्चना जैन यांनी नियमितपणे रक्तदाब व ईतर वैद्यकीय चाचण्या करण्याचे आवाहन आपल्या कर्मचाऱ्यांना केले. गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. नीता खांडेकर यांनी पोषणाचे आरोग्यासाठी काय महत्व आहे हे सांगितले.शिबिराचा लाभ एकूण 37 प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.NCD अंतर्गत भौतिक उपचार तज्ञ डॉ. कांचन भोयर (PT) द्वारा व्यायामा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या वयामुळे शरीरात होणाऱ्या बदलांना योग्य व्यायामाद्वारे कशा पद्धतीने टाळू शकतो याबाबत वेगवेगळे व्यायाम समजावून सांगितले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्त्या संध्या शंभरकर यांनी तंबाखूच्या दुष्परिणाम बद्दल मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भाविका बघेले यांनी नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले व महाविद्यालयाच्या 15 कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.तेजेश्वरी टेंभरे फूड अँड नुट्रीशन विभाग प्रमुख यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा .वनिता मच्छिरके टेक्सटाइल विभाग प्रमुख यांनी केले. या शिबिरासाठी डॉ. शुभांगी नरडे, प्रा. डॉ. गोकुला ढोके तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे सोबतच मीना मेश्राम, अरुणा गणवीर व सारिका गणवीर यांचे सहकार्य लाभले.