गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्थानीय एस. एस.गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथील गृहअर्थशास्त्र विभागा द्वारे पोषणमाहाचे आयोजन केल्या गेले, ज्यामध्ये पोषणासंबंधी जनजागृती करण्याच्या दृष्टीने विद्यार्थिनी द्वारा विविध स्वास्थ पोषण आणि आहारा संबंधी महत्वपूर्ण विषयांवर व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून प्रसारित करण्यात आले. या अंतर्गत दिनांक11/09/24 ला “स्वास्थवर्धक आहार व्हेज किंवा नॉनव्हेज” विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अर्चना जैन आणि परीक्षक म्हणून डॉ. जी.ए.भालेराव, प्रा. संदीप राहुल उपस्थित होते. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येत स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. सोहा सैय्यद , द्वितीय क्रमांक कु. ममता कुमावत, तृतीय क्रमांक कु. शमा सिद्दिकी तर उत्तेजनार्थ कु. रितिका ताम्रकार आणि कु. मधु कुमावत ला प्राप्त झाले. स्पर्धेचे सूत्रसंचालन कु. नुपूर थानथराटे आणि आभार प्रदर्शन कु. मानसी भरणे द्वारे केल्या गेले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. ए. भालेराव,डॉ.माधुरी खोब्रागडे, प्रा.दीप्ती ब्राह्मणकर, प्रा. रश्मि रणदिवे आणि विद्यार्थिनींनी सहकार्य केले.