गृहविज्ञान विभागाचा शैक्षणिक अभ्यास दौरा दिनांक १३/१२/२०२५

गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे एस. एस. गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथील गृहविज्ञान विभागाच्या वतीने दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी लांजी व आमगाव येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात एकूण ४५ विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.

हा दौरा गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. गोकुला भालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्यासह विभागातील एकूण चार प्राध्यापक उपस्थित होते. या शैक्षणिक दौर्‍याचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवून देणे व अभ्यासक्रमाशी संबंधित बाबी समजावून घेणे हा होता.

दौऱ्यादरम्यान विद्यार्थिनींनी विविध ठिकाणी भेटी देऊन सामाजिक, आर्थिक व गृहविज्ञानाशी निगडित घटकांचा अभ्यास केला. या दौर्‍यामुळे विद्यार्थिनींमध्ये निरीक्षणशक्ती, व्यवहारज्ञान तसेच सामाजिक जाणीव वाढीस लागली.

हा शैक्षणिक अभ्यास दौरा विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला. दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख व सर्व प्राध्यापकांचे तसेच सहभागी विद्यार्थिनींचे सहकार्य मोलाचे ठरले.

शैक्षणिक अभ्यास दौरा यांचे काही व्हिडिओ खालील लिंक वरुन पहावेत –

Home Economics Educational Tour to Shyam Hositext Amgaon

Home Economics Educational Tour to Lanji